---Advertisement---
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्यसभा खासदार पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम साहेब यांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या प्रसंगी जिल्ह्याच्या विविध विकासकामांबाबत व शेतकरी, तरुण तसेच जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकरी बांधवांचे झालेले नुकसान याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून राज्य शासन केंद्र सरकारकडेही सातत्याने पाठपुरावा करत आहे. या संदर्भात नक्कीच मुख्यमंत्री महोदय लवकरच योग्य तोडगा काढतील, असा विश्वास खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक , महेश्वर रेड्डी यावेळी उपस्थित होते.
---Advertisement---