---Advertisement---
Extra Marital Affair : पती, मुलांना सोडून महिला प्रियकरासोबत पळून गेली, अश्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत, त्या तुम्ही वाचल्या असतीलच. आता असाच एक चक्रावणारा प्रकार समोर आला आहे, जिथे पाच मुलांची आई आणि सात मुलांचा बाप दोघेही संसार वाऱ्यावर सोडून फरार झालेय. यामुळे गावात खळबळ उडाली असून, चर्चेचा विषय बनला आहे.
पोलीस सूत्रानुसार, अर्शद हा पत्नी व पाच मुलांसह भाड्याच्या घरात राहतो. तिथे जवळच राहणाऱ्या सात मुलांचा बाप सोनूसोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते.
दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले की संसार वाऱ्यावर सोडून पळून गेले. याबाबत महिलेचा पती अर्शद याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, महिलेचा शोध सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशच्या कासगंज परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेचा पती अर्शद याने म्हटले आहे की तो कासगंजमधील नागरी गेट येथे कामासाठी भाड्याच्या घरात राहतो. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता त्याची पत्नी सोनू नावाच्या पुरूषासोबत पळून गेली.
अरशदच्या म्हणण्यानुसार, त्याला नंतर कळले की सोनू सात मुलांचा बाप आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, महिलेचा शोध सुरू केला आहे.









