डॉक्टरकडून तरुणीचे लैंगिक शोषण; लग्नाचे आमिष दाखवून शोषण करणारा डॉक्टर अटकेत, वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ…!

---Advertisement---

 

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने लग्नाचे आश्वासन देत एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. या घटनेमुळे आष्टी परिसरात खळबळ उडाली असून वैद्यकीय क्षेत्रातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

या घटनेबाबत गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या आष्टी येथील एका खासगी रुग्णालयाशी संबंधित असलेल्या डॉक्टरने पीडित तरुणीशी जवळीक निर्माण केली होती. लग्न करण्याचे आश्वासन देत त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या विश्वासाचा गैरफायदा घेत वेळोवेळी तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

काही काळानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित डॉक्टरने लग्नास नकार दिल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली.

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर आष्टी परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---