---Advertisement---
जळगाव : ओव्हरटेक करताना दुचाकी चालकाच्या सहयोगी निष्काळीपणातून एस.टी. बस दुचाकी अपघाताला ५० टक्के दुचाकीचालक जबाबदार ठरवित न्यायालयाने अशा परिस्थितीत एस.टी. महामंडळाला पूर्ण नाही परंतु ५० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून मयताच्या कुटुंबाला द्यावी, असे आदेश दिले. तसेच या निर्णयाने महामंडळाची मोठी रक्कम वाचण्यास मदतही झाली आहे.
या घटनेची माहिती अशी की, १३ मार्च २०२३ रोजी सचिन राजेंद्र शेळके (रा.मनुर, ता. बोदवड) तसेच त्याचा मित्र भागवत प्रल्हाद शेळके, जितेंद्र कैलास चावरे असे तिघे दुचाकी (एमएच-१९ सीएस-११९८) ने वरणगाव-बोदवड मार्गाने जात होते. बस दुचाकी अपघातात
दुचाकी चालक गंभीररित्या जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता. अन्य दोघे जखमी झाले होते. उपचारात जितेंद्र चावरे याचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी भरधाव वेगाने बस चालवित चालकाने दुचाकीला धडक दिली, अशी तक्रार वरणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. मयत सचिन याची पत्नी भारती शेळके यांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जळगाव येथे मोटार अपघात न्यायधीकरणासमोर अर्ज दिला होता. त्यात ४५ लाख ३७ हजार रुपयांची भरपाई तसेच या रक्कमेवर नऊ टक्के व्याज मिळावे, अशी मागणी एस.टी. महामंडळाकडे केली होती.
बस चालक दिलीप आप्पा तायडे यांनी एस.टी. महामंडळातर्फे साक्ष देताना म्हटले, सदर अपघात बसचालकाच्या चुकीने झाला नसून दुचाकी चालक व सोबतचे तिघे जण हेल्मेट न परिधान करता कायदा मोडुन ट्रीपल शीट दुचाकी चालवित होते. मार्गाववर ते झिकॉक दुचाकी भरधाव वेगात छोट्या हत्तीला ओव्हरटेक करत बसच्या चालक साईडला धडक दिली. त्यांनतर त्यांच्या चुकीने ते रस्त्यावर पडले व अपघात झाला. अर्जदार भारती शेळके यांची ही साक्ष नोंदविण्यात आली.
एस.टी. महामंडळाचे कायदेशीर सल्लागार तथा ज्येष्ठ विधीज्ञ विजय एस. काबरा यांनी युक्तीवाद केला. त्यांनी सांगितले की, हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाला नसून प्रवासी असल्याने व्यवस्थीत नियंत्रणात बस चालत होती. दुचाकी चालकाने वाहतूक नियमांचे पालन न करता छोट्या हत्तीला ओव्हरटेक करण्याच्या नादात बसला चालकाच्या बाजुने दुचाकीची धडक दिली. त्यांच्या निष्काळजीपणाने हा अपघात झाला. त्यामुळे एस.टी. महामंडळास देणे लागत नाही, असा मुद्दा मांडला.
न्या. एस.एन. राजुरकर यांनी ५ डिसेंबरला या प्रकरणी निकाल देताना मयत दुचाकी चालकाच्या सहयोगी निष्काळीपणाने ५० टक्के म्हणून म्हणून अपघात झाला आहे. अशा परिस्थितीत एस.टी. महामंडळाविरुध्द ५० टक्के रक्कम ११ लाख ६७ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच या रक्कमेत ९ लाख ७४ हजार ५०० या रक्कमेवर नऊ टक्के व्याज द्यावे, असा आदेश केला. अपघातातील दुसरा मयत जितेंद्र चावरे याचे वडील कैलास तुळशीराम चावरे यांनी ३७ लाख ९३ हजार रुपये नुकसान भरपाई व रक्कमेवर नऊ टक्के व्याज द्यावे, असा क्लेम केला होता. न्यायालयाने यामध्ये ५० टक्के जबाबदार धरत अर्जदाराला ७ लाख ५० हजार रूपये देण्याचा आदेश केला. तसेच ५ लाख ९७ हजार या रक्कमेवर सात टक्के व्याज द्यावे, असे नमुद केले आहे.









