---Advertisement---
Extramarital affair : दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून विधवा वहिनीसोबत भयंकर घडल्याची घटना समोर आली आहे. महिला अचानक गायब झाल्यानंतर, मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, तब्बल एक महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊयात.
पोलीस सूत्रानुसार, वसंत असे दिराचे, तर सुनैना असे विधवा महिलेचे नाव आहे. संबंधित महिलेच्या मुलाने ”आई” बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास सुरु केला असता, वसंत आणि सुनैना या दोघांत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून, डीसीआरबी अहवालासह, महिलेचा मोबाइल नंबर आणि वसंतच्या मोबाइल नंबरचा सीडीआर मिळवला. तपासात असे समोर आले की वसंत हा सुनैनाचा मोबाइल वापरत होता.
पोलिसांनी वसंतशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की तो सुनैनाला ओळखत नाही. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वसंतला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
कठोर चौकशीत, त्याने कबूल केले की, उसाच्या शेतात सुनैनाची गळा दाबून हत्या केली. त्यानुसार पोलिसांनी त्यालसोबत घेत, उसाच्या शेताची झडती घेतली असता मानवी कवटी, एक लहान हाड, एक साडी, चप्पल आणि एका महिलेचे केस आढळले. त्यानंतर, फॉरेन्सिक टीमला कळवण्यात आले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.
तसेच सुनैनाचा मुलगा अंगद यालाही माहिती देण्यात आली. तो घटनास्थळी पोहोचला, त्याने त्याच्या आईच्या चप्पल आणि साडीची ओळख पटवली. फॉरेन्सिक टीमने सर्व पुरावे गोळा केले. पोलिसांनी मानवी कवटी, लहान हाडे आणि इतर हाडांचे अवशेष पोस्टमॉर्टम तपासणीसाठी पाठवले. पोलिसांनी आरोपी वसंतला अटक केली असून, पुढील तपास करत आहे.
अनैतिक संबंधांमुळे हत्या
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये ही घटना घडली आहे. सीओ खड्डा वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, दोघांत अनैतिक संबंध होते. आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली. आरोपीविरुद्ध आता कारवाई सुरू आहे.









