---Advertisement---
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज शांततेत आणि बिनविरोध पार पडली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार झालेल्या या निवडीत सभापतीपदी श्री. लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांची, तर उपसभापतीपदी श्री. जयराज जिजाबराव चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवड जाहीर होताच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नूतन सभापती आणि उपसभापती यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजयदादा पवार, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम यांच्यासह बाजार समितीचे संचालक मंडळ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.









