जळगाव महानगरपालिका महापौर पदासाठी ओबीसी महिला राखीव : कोण होणार महापौर याकडे जळगावकरांचे लक्ष

---Advertisement---

 

जळगाव महापालिकेच्या राजकारणात आज मोठी घडामोड समोर आली आहे.महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून जळगाव महापौरपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील मंत्रालयात आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाची चक्राकार पद्धतीने सोडत काढण्यात आली. या सोडतीत जळगाव महापालिकेसाठी ओबीसी महिला हे आरक्षण निश्चित झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले होते.

भारतीय जनता पक्षाला ४६ जागा, शिवसेनेला २२ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना-उबाठा पक्षाने पाच जागांवर विजय मिळवला, तर एका अपक्ष उमेदवाराने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती.

अशा प्रकारे महापालिकेत महायुतीचे तब्बल ७० सदस्य तर विरोधकांचे फक्त पाच सदस्य निवडून आले आहेत. काल नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महायुतीची गटनोंदणी करण्यात आली होती.

भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश बालाणी तर शिवसेनेच्या गटनेतेपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली.

आता महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने, महायुतीत कोणत्या महिला नेत्या महापौरपदी विराजमान होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः भाजपमध्ये अंतर्गत हालचाली वेगाने सुरू होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता जळगावचा पहिला ओबीसी महिला महापौर कोण असेल, याचा निर्णय लवकरच स्पष्ट होणार आहे

 महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर ;

1. छत्रपती संभाजीनगर:  सर्वसाधारण  (महिला)

2. नवी मुंबई:  सर्वसाधारण

3. वसई- विरार: सर्वसाधारण

4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती

5. कोल्हापूर: ओबीसी

6. नागपूर:  सर्वसाधारण

7. बृहन्मुंबई:  सर्वसाधारण

8. सोलापूर:  सर्वसाधारण

9. अमरावती:   सर्वसाधारण (महिला)

10. अकोला: ओबीसी  (महिला)

11. नाशिक:  सर्वसाधारण

12. पिंपरी- चिंचवड:  सर्वसाधारण

13. पुणे:  सर्वसाधारण

14. उल्हासनगर: ओबीसी

15. ठाणे: अनुसूचित जाती

16. चंद्रपूर:  ओबीसी (महिला)

17. परभणी: सर्वसाधारण

18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )

19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण

20. मालेगाव: सर्वसाधारण

21. पनवेल:  ओबीसी

22. मीरा- भाईंदर:  सर्वसाधारण

23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण

24. सांगली- मिरज- कुपवाड:  सर्वसाधारण

25. जळगाव:  ओबीसी (महिला)

26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)

27. धुळे: सर्वसाधारण  (महिला)

28. जालना: अनसूचित जाती (महिला)

29. इचलकरंजी:  ओबीसी🙏

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---