---Advertisement---
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार ? कोण उपमुख्यमंत्रिपदाची घेणार यांची चर्चा रंगली होती. याबाबत अनेक सवाल उपस्थित केलं जात होता. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार या थेट मुंबईत दाखल झाल्या. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं.
गिरीश महाजन काय म्हणाले ?
मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सांगितलं आहे. आम्हाला काही अडचण नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला खूप घाई होत असलेल्या प्रश्नावर उत्तर देत महाजनांनी म्हटले की, काही तांत्रिक अडचण किंवा रणनीती असेल, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलाय.
घाई होते आहे की नाही याबाबत मी काय बोलावे. त्यांची काही तरी अडचण असेल, काही तरी कारण असेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर गिरीश महाजन यांनी म्हटले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमचा विषय नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच, आम्हाला कुठली अडचण नाही. सुनेत्रा वाहिनी आणि त्यांनी ठरवावे. त्यांनी ठरवावे काय करायचे
एकत्र होण्याबाबत काही असत तर त्यांनी बोलावलं असत. धावपळीत छोटे खाणी कार्यक्रम आहे, सर्वांनाच बोलावले नाही, मी जाणार आहे, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले. अजित पवार यांच्या निधनाच्या काही तासात सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, शरद पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्या आहेत.









