---Advertisement---
अलीगडमध्ये गाजलेल्या सासू आणि जावई प्रकरणात एक वेगळा खुलासा झाला आहे. स्वतःच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नपूर्वीच पळून गेलेली सासू ही दहा महिने बिहारमध्ये राहत होती. मात्र आता ती जावयाला सोडून तिच्याच बहिणीचा नवरा अर्थात दाजींसोबत पळून गेल्याच उघडकीस आलय. एवढेच नाही तर सोबत लाख रुपये आणि सोन्याचे दागिनेही घेऊन गेल्याचा दावा हात जावयाने केला आहे.
अलीगडचं सासू जावयाचे प्रकरण हे बरंच गाजत होतं, अनेकांना त्याची आठवण देखील असेल. आपल्या स्वतःच्या मुलीचा होणारा नवरा अर्थात तिचा जावई म्हणजेच भावी जावयासोबत सासू हे पळून गेली होती तीच सासू आता पुन्हा अलिगड मध्ये चर्चेत आली आहे. सुमारे 10 महिन्यांपासून ही सासू तिचा होणारा जावई राहुल सोबत पती-पत्नीप्रमाणे राहत होते आणि आता तिने जावयाला सोडून दिलाय आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती सासू आता तिच्या दाजींसोबतच पळून गेली आणि लाखो रुपये तसेच सोन्याचे दागिने घेऊन सासूने पलायन केला आहे. यामुळे वैतागलेला आणि त्रस्त झालेला जावई याने अलीगड पोलिसात सासूविरुद्ध तक्रार दाखल केली आहे पण हे प्रकरण बिहारचं असल्याचं सांगत पोलिसांनी त्यावर कुठलीही कारवाई करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
एप्रिल 2025 मध्ये या संपूर्ण घटनेला सुरुवात झाली. पलायन केलेल्या महिलेच्या मुलीचे लग्न हे 16 एप्रिल 2025 रोजी होणार होतं त्यामुळे त्यांचं घरी लग्नाचे सर्व कार्य सुरू होते नातेवाईक येत होते लग्नाची जोरदार तयारी ही सुरू होती पण लग्नाच्या बारा दिवस आधी अनपेक्षित घडलं आणि ते म्हणजे होणाऱ्या जावई सोबत सासू हे पळून गेले असा आरोप हा कुटुंबीयांचा होता आणि ती लाखो रुपये व सोन्याचे दागिने रोख रक्कम ही घेऊन पळाली होती, घरात आईने दहा रुपये सुद्धा सोडले नाही असं त्यावेळी मुलीने आरोप केला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबानुसार सदर महिलेने भावी जावयास स्मार्टफोन दिला होता, त्यामुळे सासू आणि जावयामध्ये संवाद वाढला सुरुवातीच्या संवादातील लग्नाच्या तयारी बद्दल बोलत होते नंतर त्यांचं फोनवरील बोलणं हे दिवसेंदिवस वाढू लागलं. सदर महिलेच्या पतीने सांगितलं की जेव्हा मी लग्नाच्या तयारीसाठी घरी आलो तेव्हा माझी पत्नी व माझा होणारा जावई हे तासंतास फोनवर बोलत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं सुरुवातीला हे मला सामान्य वाटलं परंतु काही काळ ओलांडल्यानंतर मला संशय निर्माण होत गेला.
अलिगडच हे प्रकरण चर्चेत आलं पोलीस सक्रिय झाले सासू आणि जावई पळून गेल्याने सगळीकडे खळबळ माजली होती. सासू आणि जावई हे दोघे अलीगड येथून कासगंजला, त्यानंतर बिहारच्या मुजफ्फरपुर ला पळून गेल्याची माहिती समोर आली होती काही दिवस तिथे ते थांबले त्यानंतर त्यांनी नेपाळ सीमेवर जाण्याचा प्लॅन केला यानंतर जावयाने सांगितले की जेव्हा त्याने त्याचा मोबाईल फोन सुरू केला तेव्हा त्यांना सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झालेले दिसले आणि सर्वत्र ही चर्चा पसरली आणि तेव्हा मुजफ्फरपुर होऊन ते बसणे उत्तर प्रदेश कडे रवाना झाले आणि शेवटी पोलीस ठाण्यात शरण आले.
पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या चौकशी दरम्यान सासूने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला सासूने सांगितलं की तिचा नवरा तिला मारायचा अपमान करायचा मध्यमान केल्यानंतर तिला घराबाहेर काढण्याची धमकी द्यायचा, तसंच जेव्हा माझा जावई फोन करायचा तेव्हा कधी मी बोलायची तर कधी माझी मुलगी बोलायची यामुळे आमच्या घरात संघर्ष वाढला, आणि यातूनच तू होणारा जावई राहुल सोबत पळून जा असा टोमणा तिचा पती तिला मारत असे सासूने सांगितलं आणि सर्व परिस्थिती ही असह्य झाल्याने मी योग्य वाटेल ते केलं असंही सासूने या जबाब सांगितला आहे आणि होणाऱ्या सासूला मी आधीच ओळखतो आणि सासूच्या आग्रहास्तव मी तिच्यासोबत पळून गेलं असं जावयाने स्पष्टीकरण दिलं.
मात्र सासू आणि जावई यांनी मात्र सासू आणि जावई यांनी दहा महिने सोबत घालवल्यानंतर आता सदर महिला ही मला सोडून तिच्या दाजींसोबत पळून गेली आहे असा आरोप जावयाने केला आहे आणि जाताना माझ्याकडचे दोन लाख रुपये रोख आणि सोन्याचे काही दागिने घेऊन ती पळाली असल्याचा आरोप हा जावई राहुल याने केला आहे. “मी तिच्यासाठी माझं घर सोडलं, समाजाचा तिरस्कार सहन केला आता मी ती मला सोडून गेली आहे” असं जावई राहुल याने सांगितलं.
त्यानंतर जावई राहुलने अलीगड गाठलं आणि दादो पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण प्रकरणाचे प्रकार केली मात्र ही कठीत घटना बिहारमध्ये घडली असल्याच पोलिसांनी सांगितलं आणि कारवाईस नकार दिला त्यामुळे आता राहुल हा बिहारला जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.









