---Advertisement---
यावल शहरातील सातोद रस्त्यावर शासकीय गोदामाच्या मागे हळकाई नदीच्या पात्रात उसणवारीच्या पैशावरून वाद झाला. आणि या वादातून एका ४३ वर्षीय इसमाला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. आणि चाकूने वार करून जबर दुखापत केली. ही घटना शनिवारी घडली होती. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात यावल तालुक्यातील भालोद येथील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमीला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
यावल शहरातील सिद्धार्थ नगर भागातील रहिवाशी विनोद पंढरीनाथ मेढे वय ४३ वर्ष याने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी तो यावल शहरात होता. त्याच्याकडे बाळू रमेश तायडे व मनोहर भालेराव दोघे रा.भालोद ता. यावल हे आले. उसनवारीच्या पैशावरून त्यांनी वाद घातला आणि त्याला त्यांच्या दुचाकीवर बसून सातोद रोडवरील शासकीय गोदामाच्या मागील हडकाई नदी जवळ नेले आणि तेथे त्याला शिवीगाळ करून मारहाण केली व बाळू यांनी चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याला जबर दुखापत केली. आणि तेथे नेऊन दोघे फरार झाले. तेव्हा जखमी अवस्थेत विनोद मेढे याने यावल पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केली. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित तडवी करीत आहे









