---Advertisement---
जळगाव | लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, आज चांदीच्या किमतीतही लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आजचा सोन्याचा भाव काय आहे ?
आज सकाळी बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल 2,620 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज 24 कॅरेट सोनं खरेदीसाठी प्रति तोळा 1,55,780 रुपये मोजावे लागणार आहेत. गुरुवारी हाच दर 1,58,400 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली असून प्रति 10 ग्रॅम 2,400 रुपयांनी स्वस्त होऊन दर 1,42,800 रुपयांवर आला आहे.
आजचा चांदीचा भाव काय?
सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज 1 किलो चांदी तब्बल 15,000 रुपयांनी स्वस्त झाली असून, सध्या चांदीचा दर 2,80,000 रुपये प्रति किलो इतका आहे.
29 जानेवारी रोजी सोनं-चांदीचे दर उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर आतापर्यंत सोन्याच्या किमती अंदाजे 35 ते 38 हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत, तर चांदीच्या किमतींमध्ये 1.20 लाख रुपयांहून अधिकची घट झाली आहे.
सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे सध्या खरेदी करण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे. विशेषतः लग्नसराई, गुंतवणूक किंवा दागिन्यांसाठी आजचा दिवस ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.









