---Advertisement---
Indian Railways : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने Lokmanya Tilak Terminus (मुंबई) ते Prayagraj दरम्यान 44 साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने आता उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 04102 (एलटीटी–प्रयागराज)
ही साप्ताहिक विशेष गाडी 17 फेब्रुवारी ते 14 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी 4.55 वाजता एलटीटी येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री 12.50 वाजता भुसावळ येथे पोहोचून त्याच दिवशी सायंकाळी 5.00 वाजता प्रयागराजला पोहोचेल. एकूण 22 फेऱ्या होतील. यात फेब्रुवारी-एप्रिलमधील अतिरिक्त फेऱ्या, मार्चमधील होळी विशेष 5 फेऱ्या आणि एप्रिल-जुलैदरम्यान उन्हाळी विशेष 13 फेऱ्या असतील.
गाडी क्रमांक 04101 (प्रयागराज–एलटीटी)
ही गाडी 16 फेब्रुवारी ते 13 जुलै 2026 दरम्यान प्रत्येक सोमवारी सायंकाळी 6.00 वाजता प्रयागराजहून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 7.50 वाजता भुसावळ आणि दुपारी 2.55 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. याही गाडीच्या 22 फेऱ्या होणार आहेत.
महत्त्वाचे थांबे : कल्याण, इगतपुरी (04102 साठी), नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर.
गाडीत एसी द्वितीय, एसी तृतीय, शयनयान, सामान्य द्वितीय आणि आसन श्रेणीचे डबे असतील. 04102 साठी आरक्षण 14 फेब्रुवारी 2026 पासून www.irctc.co.in वर उपलब्ध होईल, तर अनारक्षित तिकिटे UTS प्रणालीद्वारे मिळतील.









