---Advertisement---
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Reserve Bank of India (RBI) ने असिस्टंट पदांसाठी तब्बल 650 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून 8 मार्च 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.
ही भरती देशातील विविध केंद्रांवर होणार आहे. त्यामध्ये Ahmedabad, Bengaluru, Jaipur, Mumbai, Kolkata आणि Delhi यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय?
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी. त्यांच्याकडे संगणक कौशल्य असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराचे किमान वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९९८ पूर्वी आणि १ फेब्रुवारी २००६ नंतर झालेला नसावा. तथापि, राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट मिळेल.
या नोकरीसाठी निवड झाल्यावर पगार किती ?
या नोकरीसाठी निवड झाल्यावर बेसिक पे २९,००० रुपये मिळणार आहे. तुम्हाला इतर भत्ते मिळून एकूण ५८,५१४ रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स, मेन्स, लँग्वेज प्रोफिशिएंसी टेस्टद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा ११ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.
फॉर्म भरण्यासाठी काय करावे ?
- प्रथम अधिकृत पोर्टल ibpsreg.ibps.in/rbiafeb26/ ला भेट द्या.
- “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
- आता इतर तपशील योग्यरित्या भरून फॉर्म पूर्ण करा.
- तुमची स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा.
- विहित शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
- प्रिंटआउट घ्या आणि ते सुरक्षित ठेवा.









