रमजानच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या कराचीत भीषण स्फोट; 16 जणांचा मृत्यू, 9 चिमुकलांचाही समावेश, स्फोटाचे कारण समोर….!

---Advertisement---

 

पाकिस्तानमधील प्रमुख शहर कराची येथे भीषण स्फोट होऊन किमान 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सुमारे 14 जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण गॅस गळती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास जुना सोल्जर बाजार परिसरातील एका निवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर स्फोट झाला.

रमजानचा पहिला दिवस असल्याने अनेक नागरिक सेहरीसाठी जागे होते. त्याचवेळी हा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोट इतका तीव्र होता की इमारतीचा जीर्ण भाग कोसळला. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथके दाखल झाली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये 2 ते 17 वर्षे वयोगटातील नऊ मुलांचा समावेश आहे. जखमींपैकी सात मुले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

---Advertisement---

 

दरम्यान, पाकिस्तान मध्ये गॅस टंचाईची समस्या वारंवार उद्भवत असते. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या वस्त्यांमध्ये एलपीजी सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अलीकडच्या काळात कराचीतील हा दुसरा मोठा अपघात मानला जात आहे. गेल्या महिन्यात गुल शॉपिंग प्लाझाच्या तळघरात लागलेल्या आगीत 79 जणांचा मृत्यू झाला होता.

या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अधिक तपास सुरू आहे. अधिकृत अहवालानंतरच स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---