संतापजनक: पवित्र नात्याला काळिमा….सख्ख्या भावाकडून बहिणीवर शारीरिक अत्याचार….बहीण गर्भवती; परिसरात संताप….!

---Advertisement---

 

कळमेश्वर तालुक्यातून बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सख्या भावाकडून आपल्या अल्पवयीन बहिणीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडती झाली आहे त्या संपूर्ण घटनेने महाराष्ट्रासह कळमेश्वर तालुका हादरला आहे.

कळमेश्वर तालुक्यातील एका गावात तिच्या सख्ख्या भावाने अल्पवयीन बहिणीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर पीडित अल्पवयीन बहीण ही वैद्यकीय तपासणी दरम्यान गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे या संपूर्ण संतापजनक घटनेने परिसर हादरला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सुरुवातीला या घटनेची कुठलीही कल्पना नव्हती मात्र गेल्या काही काळानंतर सदर मुलीची ही तब्येत बिघडल्याने तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या आणि या चाचणी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित प्रकरण हे अत्यंत संवेदनशील असल्याने गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

या संपूर्ण धक्कादायक घटनेमुळे राज्यासह कळमेश्वर तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांकडून पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचार तसंच मानसिक समुपदेशनाची मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे पालकांनी अल्पवयीन मुलांच्या संगोपनात सध्यातरी अधिक जागृत राहण्याची गरज असल्याचं यावे नागरिकांचे म्हणणं आहे. या संपूर्ण घटनेचा तपास हा पोलिसांकडून सुरू असून कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण केल्या जात आहे. याबाबत सुरु असलेल्या तपासाअंती अजून तपशील समोर येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---