रावेर शहरात साडेपाच क्विंटल सोयाबीन तेलाची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात ३३ हजार रुपये किमतीचे साडे पाच क्विंटल सोयाबीन तेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

रावेर शहरातील सावदा रस्त्यावरील भारत गॅससमोर असलेल्या ‘न्यू बंटी ट्रेडर्स’ या घाऊक किराणा आहे. दुकानासमोरील मोकळ्या शेडमधून तेहतीस हजार रुपये किंमतीचे तीन बॅरलमध्ये ठेवलेले सोयाबीन तेल चोरट्यांनी चोरून नेले. या तीन बॅरलमध्ये एकूण पाच क्विंटल ४० किलो तेल साठवलेले होते. सकाळी दुकान उघडताना तेलाचे बॅरल गायब असल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी दुकान मालक सोहनलाल किशोर गगनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक समाधान ठाकूर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---