वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल; शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित तसेच खाजगी शाळांमध्ये सकाळच्या सत्रात वर्ग घेण्यात येणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळा वगळता इतर सर्व इंग्रजी माध्यम शाळांनाही हा आदेश लागू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात वाढ होत असून उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना दुपारच्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

शिक्षक संघटनांनीही शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्याचवेळी आरोग्याचीही काळजी घेतली जावी यासाठी प्रशासनाने सकाळच्या सत्राचा मध्यममार्ग निवडला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने येत्या १५ मार्चपर्यंत सौम्य उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---