चूक नसताना ट्रक चालक आणि क्लिनरला मारहाण, शेण खाऊ घातल्याचा प्रकार….माणुसकीला काळिमा फासणारी घटना !

---Advertisement---

 

चूक नसतानाही ट्रक चालकासह क्लिनरला अज्ञातांनी मारहाण करत शेण खाऊ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे, महाराष्ट्रातील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना पुण्याच्या कात्रज देहू रोड बायपास वर घडली आहे.

पुणे शहरातल्या कात्रज देहूरोड बायपास वर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक ट्रक चालकास व त्याच्यासोबत असलेल्या क्लिनरला पोलिसांकडून अमानुष वागणूक दिल्याचा प्रकार हा उघडकीस आला आहे. गोरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या काही व्यक्तींनी ट्रक चालक व क्लीनरला फक्त मारहाणच नाही तर त्यांना जबरदस्तीने शेण देखील खाऊ घातले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानंतर पोलिसांकडून याबाबत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

कराड येथील रहिवासी असलेल्या मुस्लिम ट्रक चालक आणि क्लीनर हे त्यांच्या ट्रक मधून चार म्हशी घेऊन मुंबईकडे निघाले होते. या दोघांकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांची परवानगी देखील होती, तरीसुद्धा संशय त्यांनी त्यांचा ट्रक अडवला आणि तुम्ही बेकायदेशीरपणे गायची कत्तल करण्यासाठी वाहतूक करत आहात असा त्यांचा वर खोटा आरोप केला. संशयित आरोपींनी ट्रक चालकास आणि त्याच्यासोबत असलेल्या क्लीनरला शिवीगाळ केली तसेच बेदम मारहाण देखील केली आणि त्यांना जमिनीवर पडलेले शेण खाण्यास भाग पाडलं.

या संपूर्ण प्रकाराबाबत पीडित मुस्लिम ट्रक चालक आणि क्लीनर यांनी सुरुवातीला मारहाणीची तक्रार दिली. या तक्रारीत त्यांना शेण खाऊ घातलं असा कुठलेही उल्लेख केलेला नव्हता त्यानंतर संशयित आरोपींनी स्वतः या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला त्यानंतर आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी सांगितलं की सदरचा “व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि याबाबतची तक्रार ती स्वतःहून रविवारच्या दिवशी नोंदवून घेतली आणि त्यात दोन पुरुषान सह एका तृतीय पंथीयाला अटक केली आहे”.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे पुणे शहरासह परिसरात प्रचंड संताप हा व्यक्त केला जात आहे अधिकृत रीतसर कागदपत्र असतानाही केवळ संशयावरून अशी माणूस वागणे देणे हे, कायद्याचे उल्लंघन करणे, पोलिसांचं म्हणणं आहे, या तपासात अजून कोणी सहभागी आहे का हे पहावं लागणार असून नेमकी यावर पुढे काय कारवाई होईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---