मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना नंदुरबार पोलिसांकडून अटक; तब्बल 6 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 18 मोटारसायकली हस्तगत..!

---Advertisement---

 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हे शहरात सायंकाळच्या वेळी पेट्रोलींग करीत असतांना नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात एक इसम काळया रंगाची होंडा शाईन मोटारसायकल संशयास्पद स्थितीत घेऊन जातांना दिसला. त्याच्यावर पोलीस पथकास संशय आल्याने सदर व्यक्तीची पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी त्याने त्याचे नाव 1. रविंद्र आबा धनगर, वय- 28 वर्षे, रा. अक्राळे, पोस्ट रनाळे, ता.जि. नंदुरबार असे सांगितले. यावेळी त्याच्या ताब्यातील मोटारसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास पथकाने ताब्यात घेत त्याच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.

त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांनी गुन्हे शोध पथकास नमुद गुन्हयाचा सखोल तपास करणेबाबत सुचना केल्या. तपासादरम्यान ताब्यातील आरोपी रविंद्र धनगर यास विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे 2. समाधान पंडीत कोळी, वय 23 वर्षे 3. सागर पंडीत कोळी, वय 26 वर्षे दोन्ही रा. आरावे, ता. शिंदखेडा जि. धुळे यांचेसह विविध ठिकाणांहुन काही मोटारसायकली चोरी केली असल्याची कबूली दिली. त्याअन्वये गुन्हे शोध पथकाने नमुद अ.क्र. 2 व 3 अशा दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. वरील तिनही आरोपींना चोरी केलेल्या मोटारसायकलींबाबत विचारपुस करता त्यांनी नंदुरबार, धुळे, गुजरात, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केले असल्याचे सांगितले. त्याअन्वये सदर आरोपींकडून एकुण 6,40,000/- रुपये किमतीच्या 18 मोटारसायकली हस्तगत करुन विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकुण 08 गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलीसांना यश मिळाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि छगन चव्हाण, पोउपनि भुनेश मराठे, पोहेकॉ/भटु धनगर, प्रशांत पाटील, पंकज महाले, विनोद जाधव, सुनिल वाकडे, पोकॉ/राहुल पांढारकर, ललित गवळी, राहुल राठोड, विनोद महाजन, प्रविण वसावे, विशाल मराठे, हरेश कोळी, विध्देश्वर बिरारी, नरेंद्र पाडवी, किरण मोरे, मपोकॉ/रोहिणी धनगर, निंबा वाघमोडे यांनी केली आहे.

“तरी हस्तगत करण्यात आलेल्या मोटारसायकली नंदुरबार शहर पोलीस ठाणे आवारात असुन कृपया सदर मोटारसायकलींचे मालकांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचेकडून करण्यात येत आहे.”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---