शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्चला

---Advertisement---

 

देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.१३) हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे.
हा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आसामची राजधानी गुवाहाटी येथे आयोजित कार्यक्रमातून वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रातील सुमारे ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. मागील म्हणजे २१ व्या हप्त्यात राज्यातील ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येत १ लाख २ हजार ५९० शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.
दरम्यान, या योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत होते. सुरुवातीला हा हप्ता जानेवारीअखेर देण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र काही कारणांमुळे त्यात विलंब झाला.

या योजनेअंतर्गत सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यात असून या जिल्ह्यातील सुमारे ५ लाख ४५ हजार २८० शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---