जादूटोण्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या; पत्नीचा खून करून मुलाला व्हिडिओ कॉल…..धक्कादायक प्रकार….!

---Advertisement---

 

मुंबई शहरातील धारावी परिसरात एक धक्कादायक खूनप्रकरण समोर आले आहे. जादूटोण्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृत मेघा सोलंकी (वय ५८) हा धारावी कोळीवाडा परिसरातील जांबा पास्कल चाळीत आपल्या पत्नी सूरजबेन सोलंकी (वय ५२) यांच्यासोबत राहत होता. १३ मार्च रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पत्नी आपल्यावर जादूटोणा करत असल्याचा संशय आरोपीला होता. या संशयातून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असल्याचेही सांगितले जाते. घटनेच्या दिवशी आरोपीने पत्नीच्या डोक्यात पाण्याची बाटली मारली आणि त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

घटना घडल्यानंतर आरोपीने आपल्या मुलाला फोन करून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर संपूर्ण प्रकाराची कबुली दिल्याचे समोर आले आहे. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉलदरम्यान आरोपी रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसत होता. त्याने कॅमेरा फिरवून घरात पडलेला पत्नीचा मृतदेहही दाखवला.

या घटनेनंतर मुलाने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह तातडीने रुग्णालयात नेला. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी धारावी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---