ट्रम्प यांना मोदी भेटीची ओढ! लवकरच भारत दौऱ्याचे संकेत

---Advertisement---

 

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी पुन्हा एकदा सकारात्मक भूमिका घेतल्याचे संकेत दिले असून “I Love India, Love Modi… I will visit India soon” असा खास संदेश त्यांनी Narendra Modi यांच्यासाठी पाठवला आहे. त्यामुळे ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रलंबित व्यापार करारावर दोन्ही देशांमध्ये अंतरिम सहमती झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. या करारासाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी सातत्याने संपर्कात होते. या पार्श्वभूमीवर भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

गेल्या काही काळात ट्रम्प यांनी भारताविषयी कठोर भूमिका घेतली होती. विशेषतः भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला होता. तसेच भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात अमेरिकेचे योगदान असल्याचा दावा त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर केला होता. मात्र भारताने हे दावे स्पष्टपणे फेटाळले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध काही प्रमाणात ताणले गेले होते.

मात्र आता व्यापार करारावर सहमती होताच ट्रम्प नरमल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे ट्रम्प आणि मोदी पुन्हा एका मंचावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी मोदींसाठी खास संदेश पाठवला असल्याचे अमेरिकन राजकीय कार्यकर्त्या लौरा लूमर यांनी India Today Conclave 2026 मध्ये सांगितले. यावेळी त्यांनी ट्रम्प यांचा संदेशही वाचून दाखवला.

तथापि, अमेरिकेच्या मागील भूमिका लक्षात घेता भारताला या घडामोडींकडे सावधपणे पाहावे लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---