धक्कादायक प्रकार! एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड; प्रशासनात खळबळ, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

---Advertisement---

 

मुंबई/छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून बनावट कागदपत्रांचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी जिल्हा पुरवठा विभागातील अन्नधान्य वितरण अधिकारी भारतीय वाकोडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात संबंधित रेशन कार्ड शासकीय कार्यालयातून जारी झालेले नसून ते पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करून सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.

समोर आलेल्या बनावट पिवळ्या रेशन कार्डमध्ये शिंदे कुटुंबातील सदस्यांची नावेही नमूद करण्यात आली आहेत. यात पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे , सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

विशेष म्हणजे हे रेशन कार्ड हस्तलिखित स्वरूपात तयार करण्यात आले असून गेल्या दोन वर्षांपासून ते वापरात असल्याची माहिती समोर आली आहे. १२ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाचा गंभीरपणे तपास सुरू केला आहे.

राज्यात अशा प्रकारचे आणखी बनावट रेशन कार्ड तयार करणारे रॅकेट सक्रिय आहे का, याचाही शोध घेतला जात असून संबंधित आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---