गॅस सिलिंडर दरवाढ व तुटवड्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

---Advertisement---

 

गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आणि वाढत्या तुटवड्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि अघोषित तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे सांगत, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे गॅसच्या दरात वाढ झाल्याचा आरोप करत, राज्य सरकारने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील गॅस टंचाई दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.

डोळे व तोंड बांधून निषेध
या आंदोलनात आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी डोळ्यांना आणि तोंडाला कापडी पट्ट्या बांधून आंदोलन केले. “हा अन्याय आम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि तोंडाने बोललो तर विरोधी पक्ष म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात,” असा आरोप करत महायुती सरकारच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला.

तसेच साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, गॅसचा पुरवठा सुरळीत करावा आणि दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात जळगाव ग्रामीणचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख प्रमोद घुगे, योगेश चौधरी, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, भगवान धनगर, किरण ठाकूर तसेच मनसेचे पदाधिकारी प्रदीप पाटील, अशोक पाटील, सचिन चौधरी, रामदास कोळी, खुशाल अहिरे, महेश अहिरे, प्रसाद पाटील व अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---