---Advertisement---
जळगाव, दि. 17 मार्च 2026 : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी सामूहिक गुढी पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाचे स्वागत एकत्रितपणे करत सकारात्मक संकल्प करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
या सामूहिक गुढी पूजनादरम्यान पर्यावरण संरक्षण, परिसरातील हिंदूंमध्ये सौहार्द व संघटितपणा वाढविणे, तसेच निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योग, प्राणायाम आणि व्यायाम करण्याचे संकल्प नागरिकांकडून घेतले जाणार आहेत.
शहरातील विविध भागांत होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सामूहिक गुढी पूजनाची ठिकाणे पुढीलप्रमाणे :
चौघुले प्लॉट, वाल्मीक चौक, लक्ष्मीनगर (गेंदालाल मिल), ज्ञानदेव नगर चौक, पांझरापोळ चौक, के.सी. पार्क, मयुर कॉलनी (पिंप्राळा), मेहरूण, मारुती मंदिर (छत्रपती शिवाजीनगर), सुप्रीम कॉलनी, पिंप्राळा, श्रीधर नगर, श्रीराम नगर (रामेश्वर कॉलनी), व्यंकटेश नगर आणि देविदास कॉलनी.









