महागाईचा तडाखा वाढला; खाद्यतेल दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

---Advertisement---

 

Cooking Oil Price Hike: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत होत असून, आता खाद्यतेलाच्या दरवाढीने त्यात आणखी भर पडली आहे. आधीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतींचा अतिरिक्त फटका बसत आहे.गेल्या काही दिवसांत जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत आहे. विशेषतः गृहिणींना स्वयंपाकघराचे नियोजन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ अधिकच जाणवत आहे.


माहितीनुसार, खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो/लिटर सुमारे १३ ते १८ रुपयांची वाढ झाली आहे. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम स्थानिक बाजारावरही होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुमारे १६० रुपयांवर असलेले सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. घाऊक बाजारातही १० ते १५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.


खाद्यतेलाचे सध्याचे दर (प्रति लिटर/किलो अंदाजे):
शेंगदाणा तेल – १९० ते १९४ रुपये
सूर्यफूल तेल – १७३ ते १७८ रुपये
सोयाबीन तेल – १५३ ते १५९ रुपये
पाम तेल – १४५ ते १४८ रुपये
मोहरी तेल – २०० ते २०४ रुपये


एकूणच, महागाईच्या वाढत्या ताणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे किचन बजेट कोलमडत असून, येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---