गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त; जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

---Advertisement---

 

जळगाव : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
बुधवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात तब्बल ₹824 ने घसरण झाली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम ₹1,59,856 वर आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने दर कमी होत असल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. बुधवारी चांदीच्या किंमतीत प्रति किलो ₹6,180 ने घट झाली असून चांदीचा भाव ₹2,59,560 प्रति किलोवर आला आहे. सलग घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी हालचाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय तणावाचा परिणाम सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलर-रुपया दरातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे सोन्याच्या किंमतीत सतत बदल होत आहेत.
सोन्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहक अजूनही सावध भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लवकरच बाजारात खरेदीला वेग येईल, अशी अपेक्षा सुवर्ण व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---