---Advertisement---
सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात एका दिवसात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर गेल्या आठ दिवसांत सोन्याचा भाव एकूण १५ हजार रुपयांनी कमी झाला आहे.
त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली आहे. एका दिवसात चांदी ५ हजार रुपयांनी स्वस्त झाली असून, आठ दिवसांत चांदीच्या दरात तब्बल ३२ हजार रुपयांची घट झाली आहे.
सध्या जीएसटीसह सोन्याचा दर १,४९,६६० रुपये, तर चांदीचा दर २,३६,९०० रुपये इतका नोंदवला गेला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम सराफा बाजारावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे दरात चढ-उतार होत असून सध्या घसरणीचा कल कायम आहे.
या घसरणीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, जळगावसह विविध शहरांतील सराफा बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात सोने आणि चांदीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरेदीसाठी हा योग्य काळ असल्याचेही काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









