---Advertisement---
कंपनीमध्ये काम करीत असताना स्कार्प मशीनमध्ये अडकून त्यात डोके ओढल्या गेल्याने जमुना रामकरण पाटील (४५, रा. जामोद, जि. खंडवा, मध्यप्रदेश) या महिलेचा मृत्यू झाला. १७ मार्च रोजी गंभीर दुखापत झाल्यापासून महिलेवर उपचार होते, अखेर या महिलेचा २० रोजी मृत्यू झाला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील जमुना पाटील, त्यांचे पती रामकरण पाटील हे एमआयडीसीतील डी-६ सेक्टरमधील आर.सी. फूड या कंपनीत कामाला होते. नेहमीप्रमाणे सदर महिला कंपनीत काम करीत असताना १७ मार्च रोजी तिच्या गळ्यातील स्कार्प मशीनमध्ये अडकला व केसांसहीत ती मशीनमध्ये ओढल्या गेल्या. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तीन दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या या महिलेचा अखेर २० मार्च रोजी मृत्यू झाला. मृतदेह मध्यप्रदेशात मूळ गावी नेण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहेत. मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.









