जळगाव मानपात ‘बॅकडोअर’ एन्ट्री! स्वीकृत सदस्यांची ३० मार्चला घोषणा

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला असून, सोमवार (दि. ३० मार्च) रोजी होणाऱ्या विशेष महासभेत या सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्याआधी सर्व पक्षांकडून प्रस्तावित नावांची यादी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.


भाजपकडून चार, शिवसेना शिंदे गटाकडून दोन तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडूनही नावे सादर करण्यात आली आहेत. या अर्जांची छाननी २७ मार्च रोजी केली जाणार असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी निश्चित होणार आहे.


भाजपच्या वतीने डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, सुभाष शौचे आणि प्रदीप रोटे यांची नावे पुढे आली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून हर्षल मावळे व नरेंद्र सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटातून जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी शरद तायडे यांचे नाव सुचवले असून, गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा अमित साळुंखे यांचा प्रस्ताव दिला आहे.


दरम्यान, इच्छुकांकडून ‘बॅकडोअर’ एन्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या निवडीकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.


शुक्रवारी होणाऱ्या छाननीनंतर अंतिम निर्णयाचा मार्ग मोकळा होणार असून, सोमवारी महासभेत स्वीकृत सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाईल. या प्रक्रियेत भाजप व शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---