ऊन-सावल्यांचा खेळ कायम; तापमान ४० अंशांवर, बळीराजा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत….!

---Advertisement---

 

नशिराबाद शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास कायम आहे. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा वाढत असताना वातावरणात सातत्याने बदल होत असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे.

सकाळच्या सुमारास काही प्रमाणात दमट वातावरणामुळे गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर उन्हाचा तडाखा तीव्र होत आहे. सायंकाळी आकाश ढगाळ होत असल्याने पावसाची आशा निर्माण होते; मात्र अद्याप समाधानकारखा पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिराने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून शेती पेरणीसाठी तयार ठेवली आहे. मात्र पावसाअभावी पेरणीला सुरुवात करता आलेली नसल्याने खरीप हंगामाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. सकाळी दमट वातावरण, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असा क्रम कायम आहे. ढग दाटून येत असले तरी पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये निराशा पसरली आहे.

नशिराबाद शहरात वाढत्या उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून उष्ण आणि दमट वातावरणामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. ढगाळ वातावरणामुळे काही काळ दिलासा मिळत असला, तरी त्यानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---