---Advertisement---
जळगाव, दि. २८ (प्रतिनिधी) – रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६ (JCL T-20 पर्व-२)’ साठी फ्रँचायझी ऑक्शन उत्साहात पार पडले. जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात संघ मालक व आयकॉन खेळाडू निश्चित करण्यात आले.
ऑक्शनदरम्यान जळगाव किंग्स या संघासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. ही फ्रँचायझी दाल परिवार, प्रेम कोगटा व अतुल कोगटा यांनी मिळवली. आयकॉन खेळाडूंच्या लिलावात ओम मुंडे हा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला चाळीसगाव चार्जर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले.
या स्पर्धेत जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंट्स, जामनेर ब्लास्टर्स व पाचोरा टायटन्स हे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघाने प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावत संघ बळकट केला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ऑक्शनमध्ये सहभागी संघ मालकांचा सन्मान करण्यात आला.
या पर्वामुळे जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळणार असून स्थानिक खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढून बोली प्रक्रिया पार पाडण्यात आली. सूत्रसंचालन अॅड. सूरज जहांगिर यांनी केले, तर आभार अरविंद देशपांडे यांनी मानले.
संघ व मालकांची माहिती
मालक – दाल परिवार, प्रेम कोगटा, अतुल कोगटा
प्रशिक्षक – घनश्याम चौधरी
आयकॉन खेळाडू – जगदीश झोपे
चाळीसगाव चार्जर्स
मालक – सागर पार्क क्रिकेट क्लब
प्रशिक्षक – सचिन सोनवणे
आयकॉन खेळाडू – ओम मुंडे
रावेर रॉयल्स
मालक – सीए महावीर जैन
प्रशिक्षक – तनवीर अहमद
आयकॉन खेळाडू – नचिकेत ठाकूर
अमळनेर जायंट्स
मालक – सुहांस केमिकल्स, संदीप काबरा
प्रशिक्षक – राहुल निंभोरे
आयकॉन खेळाडू – शुभम शर्मा
पाचोरा टायटन्स
मालक – एस.के. ट्रान्सलाइन, हेमंत कोठारी
प्रशिक्षक – पंकज महाजन
आयकॉन खेळाडू – सचिन चौधरी
जामनेर ब्लास्टर्स
मालक – रमेशदादा जैन
प्रशिक्षक – मुश्ताक अली
आयकॉन खेळाडू – शतायू कुलकर्णी
जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या ऑक्शनप्रसंगी आयकॉन खेळाडू, प्रशिक्षक व फ्रँचायझी मालक उपस्थित.









