झुंबरची लाईट बंद म्हणजे ‘कोड सिग्नल’; भोंदू बाबाच्या विकृत साम्राज्याचा धक्कादायक खुलासा

---Advertisement---

 

मुंबई/नाशिक – स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या कृत्यांबाबत रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता आणखी एक गंभीर बाब उघड झाली असून, आपल्या विकृत कृत्यांसाठी त्याने खास ‘कोडवर्ड सिस्टम’ तयार केल्याचे तपासातून समोर आले आहे.


तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरात आपल्या केबिनमध्ये महिलांना ‘शुद्धीकरण’च्या नावाखाली बोलवायचा. त्या आधी केबिनबाहेर लावलेल्या झुंबराचा दिवा बंद केला जात असे. हा दिवा बंद असणे म्हणजे “आत कोणालाही प्रवेश नाही” असा संकेत कर्मचाऱ्यांना दिला जायचा. या संकेतिक पद्धतीमुळे कार्यालयातील काही लोकांना प्रकाराची कल्पना असूनही त्यांनी मौन बाळगल्याचे समोर येत आहे.


दरम्यान, या भोंदू बाबाने आतापर्यंत 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. ‘अवतार पूजा’सारखे शब्द वापरून त्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचाही आरोप आहे. तसेच, ‘तुर्की जादुई मध’ म्हणून प्रत्येकी तब्बल 15 लाख रुपये घेऊन लोकांना गंडा घातल्याचेही उघड झाले आहे.


या प्रकरणात आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले असून, विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या भोंदू साम्राज्याचे आणखी धक्कादायक आणि भयानक पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---