---Advertisement---
जळगाव, : पूर्ण आहुती पंचकुंडी हवन जप अनुष्ठान असे अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन राधाकिसन वाडीत पंचमुखी गायत्री शक्तिपीठ देवस्थानात उत्साहात पार पडले. शुक्रवारी (27 मार्च) नऊ दिवसापासून सुरु असलेल्या गायत्री मंत्रपठण जपाची समाप्ती झाली. त्यानंतर दरवर्षा प्रमाणे आजही महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
राधाकिसनवाडी शांतीकुंज महिला मंडळ व्दारा संचलित पंचमुखी गायत्री शक्तिपीठ मंदिरात गुढीपाडव्यापासून 50 साधकांनी गायत्री मंत्र पठण जप सुरू केला होता. या निमित्त मंदिरात दुपारी तीन ते चार या वेळेत नऊ दिवस अध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील साधकांसह भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली. चैत्र नवरात्र आणि रामनवमीच्या अनुषंगाने महाप्रसादाने शुक्रवारी (27 मार्च) अर्थात नव्ाव्या दिवशी या अध्यात्मिक कार्यक्रमाची समाप्ती झाली.
60 साधकांचे अनुष्ठान
गायत्री मंत्र जपाचे शहरातील 60 साधकांनी अनुष्ठान केले. गुढीपाडव्यापासून साधकांनी 108 गायत्री मंत्राच्या 30 माळा दिवसभर जपल्या. याला एक अनुष्ठान संबोधण्यात येते. या जप अनुष्ठानाची आज समाप्ती झाली. मंदिरात पंचकुंडी हवन होऊन महाप्रसादाने या धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाची आज उत्साहात समाप्ती झाली. पंचकुंडी हवन कार्यक्रमाला महिला तसेच पुरुष भाविकांची मंदिरात सकाळपासून गद केली होती. अतिशय शिस्तबध्द आणि नियोजनबध्दरित्या हे कार्यक्रम पार पडले.
महाप्रसाद कार्यक्रमात भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यासाठी साधकांसह अनेक मान्यवर सहभागी झाले. महिला तरुणांसह अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अशा प्रकारचे अध्यात्मिक कार्यक्रम शारदीय नवरात्रातही साजरा केला जातो.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव गायत्री परिवाराने पुढाकार घेतला.
अनुष्ठानाचे महत्व
गायत्री जपाचे अनुष्ठान भावपूर्णरित्या पूर्ण करणाऱ्या साधकाला गायत्री कृपाप्रसाद प्राप्त होतो. जीवन जगण्याचा मार्ग सुखकर होतो. कुटुंबात सुख समाधान भाव असतो. सर्वाप्रती दयाभाव येऊन आत्मशांतीची अनुभूती येते, असे साधकाने मनोगतात व्यक्त केले.
पंचमुखी गायत्री शक्तिपीठात गायत्री देवी, श्री गणेश, हनुमान यांच्या देखणी मूत विराजमान आहेत. प्रभू श्रीराम तसेच देशभरातील विविध संत, सतगुरु यांच्या प्रतिमा आणि त्यांचे अनमोल विचार उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे आहेत. मंदिरात दररोज नित्यनियमाने आरतीसह अन्य कार्यक्रम नियमित पार पडतात.









