भारतीय नौदलात बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी भरती; 69,100 रुपयांपर्यंत पगाराची संधी, अर्ज सुरू

---Advertisement---

 

नवी दिल्ली : Indian Navy मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलाच्या मेडिकल ब्रांचमध्ये (SSR Medical Assistant) भरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 आहे.
या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणानंतर आकर्षक पगार मिळणार आहे. त्यामुळे बारावी (12वी) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम करिअर संधी मानली जात आहे.


वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 1 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009 दरम्यान झालेला असावा.


शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी (12वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांमध्ये उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.


पगार व ट्रेनिं
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात दरमहा सुमारे 14,600 रुपये स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेव्हल-3 वेतनश्रेणीनुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये दरम्यान पगार मिळणार आहे.


निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांना पुढील टप्प्यांतून जावे लागेल:
इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (INET) – 100 प्रश्न, 1 तास वेळ
फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT)
अंतिम लेखी परीक्षा (इंग्रजी, सायन्स, बायोलॉजी व सामान्य ज्ञान)


अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी इंडियन नेव्ही ऑफिसिअल रिक्वायरमेंट पोर्टल या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
वेबसाइटवर जाऊन “करिअर्स ” सेक्शनमध्ये जा
“SSR Medical Assistant” पर्याय निवडा
“Apply Online” वर क्लिक करा
प्रथम नोंदणी (Registration) पूर्ण करा
नंतर लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा
आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करा
फॉर्म सबमिट करा
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जात नाही.


देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी असून, पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---