१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

---Advertisement---

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव


जळगाव : राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात डिजिटल सेवा सुधारणा, कार्यक्षम प्रशासन आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्यावर भर देण्यात आला होता.


मुंबई येथील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे आयोजित विशेष समारंभात जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.


या यशामुळे जळगाव जिल्ह्याने प्रशासनात नवकल्पना आणि प्रभावी सेवा देण्याबाबत आपली ठोस छाप पाडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---