जळगाव शहरात मास्टिफ सिल्व्हर इन हॉटेलचा शानदार शुभारंभ

---Advertisement---

 

जळगाव येथील मास्टिफ सिल्व्हर इन हॉटेलचे काल शानदार सोहळ्यात उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महापौर सौ. दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी भंगाळे परिवाराच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, विविध क्षेत्रात त्यांनी केलेली प्रगती वाखाणण्याजोगी असून मेहनत, चिकाटी आणि व्यवसायाप्रती असलेली निष्ठा यामुळेच हा यशाचा टप्पा गाठता आला आहे. भंगाळे परिवार इतर उद्योजकांसाठी प्रेरणादायी आदर्श असल्याचेही त्यांनी नमूद केले.


पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात भंगाळे परिवाराला शुभेच्छा देत हॉटेल व्यवसायासाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


कार्यक्रमास माजी आमदार चंदूलाल पटेल, माजी महापौर सीमा भोळे, मनपा सभागृह नेते नितीन लढ्ढा, अरविंद देशमुख, अमर जैन, प्रकाश बालाणी यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ललित चौधरी, योगेश्वर गर्गे, उद्योजक दीपक चौधरी, भगवतीप्रसाद मुंदडा आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी केले, तर हॉटेलचे संचालक सुनिल भंगाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी भंगाळे परिवारातील डॉ. ए. जी. भंगाळे, भागवत भंगाळे, रामदास भंगाळे, डॉ. प्रकाश भंगाळे, शामकांत भंगाळे, सागर भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---