फैजपूरमध्ये विराट हिंदू संमेलनास जनसागर उसळला, सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आता तरी हिंदूंनी कटिबद्ध होत जागे व्हावे, गौतम खट्टर यांचे प्रतिपादन

---Advertisement---

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी महोत्सव निमित्त सकल हिंदू समाजात एकता, सामाजिक बंधूता दृढ व्हावी तसेच हिंदू समाजातील जात, भाषा, आणि पंथ यांचा भेदभाव विसरुन एकत्रिकरणाच्या मुख्य उद्देशाने व सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी विराट हिंदू संमेलना चे आयोजन भारतभरात  केले जात आहे. या अंतर्गत कुटुंब प्रबोधन ,सामाजिक समरसता, पर्यावरण,नागरिक कर्त्यव्य,,स्वदेशी, या ‘पंच परिवर्तनातून राष्ट्रीय पुनरुत्थान’ ची सामाजिक राष्ट्र चळवळ उपक्रम हाती घेण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून  दिनांक  २८ मार्च २०२६ शनिवारी संध्या. फैजपूर श्री खंडोबा मंदिर परिसरात सकल हिंदू समाजाचे विद्यमाने  ” विराट हिंदू संमेलन ” चे आयोजन करण्यात आले या  संमेलनाचे मुख्य वक्ताश्री आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवक्ते  तथा  सनातन महासंघ दिल्ली संस्थपक गौतम खट्टर  व भुसावळ जिल्हा संपर्क प्रमुख  पंकज चौक  होते  देशातील व जगभरातील  हिंदू धर्मीयांवर  होणारे अमानवीय हल्ले ,निर्घृण हत्याकांड हिंसाचार  बघता  सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आता तरी हिंदूंनी एकत्रितपणे कटिबद्ध होत जागे झाले पाहिजे असे प्रतिपादन – गौतम खट्टर यांनी ऐतिहासिक फैजपूरच्या हिंदू संमेलन प्रसंगी केले.

गौतम खट्टर ,पंकज चौक यासोबत खंडोबा देवस्थान उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनकुमारदासजी महाराज, श्रीकृष्ण मठाचे राजधरबाबा पुजदेकर, खुशाल महाराज मंदिर गादीपती  ह.भ.प. प्रवीण महाराज, इस्कॉन मंदिराचे कन्हैयादास प्रभू, अतुल गोविंददास महाराज  भुसावळ, सभामंचवर स्थानापन्न होती  .प्रारंभी प्रमुख वक्ते गौतम खट्टर व संत महंत हस्ते गो पूजन ,भारत माता प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज तैलचित्रांचे विधिवत पूजन व दीपप्रज्वलन करून विराट हिंदू संमेलन चा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्र धर्म घोषणा निनादणी परिसर दणाणून गेला तद्नंतर गौतम खट्टर पंकज चौक सह संत महंत यांचा समितीचे विद्यमाने शाल ,श्रीफळ गुलाब,पुष्पमहामाळा  छत्रपती शिवाजी महाराज तैलचित्र, मोगरा झाड देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम  प्रारंभी  महामंडलेश्वर पवनकुमारदास  यांनी आशिर्वचन मांडले.  कुटुंब प्रबोधन ,सामाजिक समरसता, पर्यावरण,नागरिक कर्त्यव्य,,स्वदेशी, या ‘पंच परिवर्तनातून राष्ट्रीय पुनरुत्थान’ ची सामाजिक राष्ट्र चळवळ मधून प्रत्येक हिंदूंनी राष्ट्र व समाज प्रबोधनाचे कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा संपर्क संघ प्रमुख पंकज चौक यांनी केल.

आपण सर्वजण ‘सनातनधर्मीय’ आहोत आणि ‘सनातन धर्म’ हा आपल्या सर्वांचा आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी जे काही करणे आवश्यक असेल, ते करण्यास आपण सज्ज असले पाहिजे—अगदी त्यासाठी आपल्या जातीय अस्मिता बाजूला सारून, ‘सनातनधर्मीय’ म्हणून आपली मूळ ओळख पूर्णपणे स्वीकारणे गरजेचे आहे . जर आपण आता असे करण्यात अपयशी ठरलो, तर इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करेल; काश्मीरच्या वाट्याला जे दुर्दैव आले, किंवा अलीकडेच मुर्शिदाबादमध्ये जे घडले, त्याच नशिबाला आपल्यालाही सामोरे जावे लागेल.

 हिंदुस्थानावर  आक्रमण कारि असलेल्या क्रूर हिंदू हत्यारा असलेला औरंगजेब ची कबर आजही पूजनीय आहे अल्ला पेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही प्रार्थना म्हणणारा मुस्लिम समाज तेथे नमाज अदा करीत मुस्लिम समाज काय सिद्ध करतो ,फैजपूर च रामपूर  होण्यास येथे चालणारी राजरोस पणे चालणारी कत्तलखाने मोठा अडसर असल्याचे सूतोवाच त्यांनी करीत स्व धर्म ,स्व देश ,स्व व्यापार उद्दोग चा नारा त्यांनी दिला 

आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी—आपल्या भावी पिढ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी—आपण सर्वप्रथम आणि प्रामुख्याने ‘जातिवाद’ पूर्णपणे सोडून दिला पाहिजे. जर आपण ही गोष्ट सोडून दिली नाही—जर आपण केवळ ‘माझी जात’ याच चौकटीत विचार करत राहिलो—तर, जेव्हा “आपल्याकडून नक्की कुठे चूक झाली?” असा प्रश्न विचारण्याची वेळ येईल, तेव्हा दोष देण्यासाठी आपल्याकडे स्वतःशिवाय दुसरे कोणीही उरणार नाही.

 आपल्या प्रभावी भाषणातून हिंदू समाजाने जात, भाषा व पंथभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. सामाजिक समरसता, राष्ट्रभक्ती आणि हिंदू जागृती यावर त्यांनी ठाम व विचारप्रवर्तक भूमिका मांडत समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले. हिंदू समाजाने अंतर्गत भेदभाव विसरून एकजूट साधणे ही काळाची गरज असून, संघटित समाजच राष्ट्राला बळकट बनवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. संस्कार, धर्मपरंपरा आणि भारतीय संस्कृतीचे जतन करत नव्या पिढीमध्ये राष्ट्राभिमान व कर्तव्यभाव जागृत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून धर्म, संस्कृती आणि राष्ट्ररक्षणासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यापूर्वी सकाळी खंडोबा देवस्थान परिसरातून महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व महामंडलेश्वर पवनदासजी महाराज यांच्या उपस्थितीत  विश्व हिंदू परिषद मातृशक्ती  चे नेतृत्वाखाली पारंपारिक वेशभूषा त शेकडो महिलापुरुषांनी फैजपूर शहरातून भव्य दिव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीमुळे शहरात उत्साहाचे आणि हिंदू ऐक्याचे वातावरण निर्माण होत संमेलनाची मोठी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी महेश वाघोदेकर यांच्या छावा मर्दानी आखाडा च्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन शस्र विद्याभ्यासाची चित्तथरारक प्रात्यक्षिके करून उपस्थितीतांची लक्ष वेधले  संपूर्ण कार्यक्रम हिंदू एकता, धर्माभिमान आणि राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला होता  कार्यक्रम नंतर शिस्तबद्ध पणे पर्यावरण पूरक  महाप्रसाद भोजनचा उपस्थितानी लाभ घेतला  या वेळी आयोजकांन कडून प्लस्टिक ग्लास ,डिश वापर टाळण्यात आला तसेच येथील केरकचरा तत्काळ मार्गी लावून हिंदू संमेलन प्रसंगी आयोजकांनी पर्यावरण,सामाजिक समरसता, पर्यावरण,नागरिक कर्त्यव्य,,स्वदेशी, या ‘पंच परिवर्तन तत्वे आगीकारलेचे निदर्शनास  आले

आयोजन समिती प्रमुख ऍड गुंजन वाघोदे, हर्षल महाजन ,किरण मोरे ,विशाल वर्मा,विक्की जयस्वाल, निलेश चौधरी, देवेंद्र जोशी ,राकेश जैन विनोद परदेशी पंकज गलवाडे रुपेश चौधरी राहुल परदेशी कल्पेश खत्री ,जीके महाजन, मयूर भारंबे ,तुषार भारंबे ,विकी काकडे वसंत परदेशी करण परदेशी सोहन महाजन गोपाल तेली, मिथिलेश चौधरी ,श्याम भंगाळे, अमोल महाजन, मनोज होले, हर्शल पाटील विशाल चौधरी,वैभव वकारे,नीरज झोपे ,रितेश चौधरी, हेमंत भांगळे,नामदेव भंगाळे, विनायक भंगाळे, चंद्रकांत भिरुड ,मनोज सराफ  केतन गुजराती, वैशाली किरंगे,हेमांगी चौधरी, सह भारंबे वाडा ,विठ्ठल मंदिर वार्ड मित्र मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नीलिमा पाटील, कळमोदा तर सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा चौधरी यांनी केले

  याप्रसंगी नगराध्यक्षा दामिनी सराफ  सह नगरसेविका नगरसेवक आजी माजी ,विविध राजकीय , सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी  हजारो हिंदुजनांची जनसगरात उपस्थिती होती 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---