शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला गती; झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचा संकल्प – एकनाथ शिंदे

---Advertisement---

 

मुंबई | प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांनी राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला वेग देण्यासाठी ‘शिवशाही पुनर्वसन प्रकल्पा’ला बळकटी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मुंबईतील नंदनवन बंगला येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, पुनर्वसन प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि जलद करण्यासाठी खासगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात ‘विशेष संयुक्त उपक्रम’ (SPV) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासगी क्षेत्रातील कौशल्याचा उपयोग करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार आहे.


राज्यातील अनेक पुनर्वसन प्रकल्प विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहेत. अशा प्रकल्पांना ‘शिवशाही पुनर्वसन’ अंतर्गत आणल्यास त्यांना गती मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.


तसेच MMRDA, SRA, MHADA, CIDCO तसेच मुंबई व ठाणे महानगरपालिकांच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.


शिवशाही प्रकल्प ही शासकीय कंपनी असल्यामुळे तांत्रिक अडथळ्यांवर मात करताना चटई निर्देशांक (FSI) चा लाभ मिळणार असून त्यामुळे पुनर्वसन प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल.


सामान्य नागरिकांना हक्काची घरे देणे आणि झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---