अमेरिकेची धमकी झुगारून रशियाची क्युबाला कच्च्या तेलाच्या तीन टँकरची मदत

---Advertisement---

 

मॉस्को : जगातील कुठल्याही देशाने क्युबाला कच्चे तेल देऊ नये, असा इशारा दिला. अमेरिकचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्यांच्या आदेशाने अमेरिकेने कॅरिबियन बेटावरील ऊर्जा नाकेबंदी सुरू केली होती. अशातच अमेरिकेच्या धमकीला झुगारात रशियाने क्युबाला तीन कच्च्या तेलाचे टँकर पाठवले आहे.

अमेरिकेकडून क्युबा देशाची ऊर्जा कोंडी करण्यात येत होती. क्युबाला कुणीही तेल पाठवू नये असे अमेरिकेने बजावले होते. मात्र, व्हेनेझुएलाकडून क्युबाला तेल पुरवठा सुरू होता. परंतु, तिथेही ट्रम्प यांनी सैन्य कारवाई करीत मादुरो यांना अटक केली आणि तिथल्या तेलावर नियंत्रण मिळवले.

या घटनेमुळे क्युबावरील संकट वाढले. ऊर्जा संकटामुळे देशात विजेचे संकट निर्माण झाले. अनेक अडचणींचा सामना तिथल्या लोकांना करावा लागला. अशा परिस्थितीत रशिया क्युबा देशाच्या मदतीसाठी धावून पुढे आला. ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या क्युबाला तेल टँकर मिळाल्याचा आम्हाला आनंद अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने समाज माध्यमावरील पोस्टमधून दिली.

रशियाने या महिन्याच्या सुरुवातीला अनातोली कोलोडकिन नावाचा तेल टँकर क्युबाला पाठवला होता आणि आता तीन टँकर तेथे पोहोचले आहे. रशियाच्या मदतीवर नरमाईची भूमिका घेत ट्रम्प म्हणाले, रशियाने पाठवलेल्या टँकरवर आम्हाला आक्षेप नाही. एक महिन्यासाठी रशियाच्या तेलावरील बंदी उठवल्याने ते निर्यात करू शकतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---