बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती; एकनाथ खडसे यांचं मत…!

---Advertisement---

 

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, असे मत राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. मोठ्या नेत्याच्या निधनानंतर अशा निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ खडसे म्हणाले की, एखाद्या मोठ्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्यास संबंधित जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जातात. मात्र बारामतीच्या बाबतीत तसे झाले नाही.


इतर पक्षांनी उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध होण्यास सहकार्य केले, पण काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार दिला. हे त्या पक्षाचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---