NEET Scam Update: नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; ‘ते’ प्रभावशाली पालक आता थेट CBI च्या रडारवर!

---Advertisement---

 

नीट (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेच्या (CBI) चौकशीतून आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. नीट परीक्षेचा पेपर देशातील तब्बल ५ राज्यांमध्ये विकला गेला असून, यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी आणि त्यांच्या डिजिटल उपकरणांच्या (गॅजेट्स) फॉरेन्सिक तपासणीतून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.


​महाराष्ट्र बनला होता पेपरफुटीचा मुख्य केंद्रबिंदू
CBI च्या तपासानुसार, या संपूर्ण पेपरफुटीचे मुख्य केंद्र महाराष्ट्र हेच होते. महाराष्ट्रातूनच राजस्थान आणि इतर ३ राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत नीट परीक्षेची ‘प्रश्न बँक’ पोहोचवण्यात आली होती. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या पेपरच्या अनेक झेरॉक्स प्रती काढून त्या विकल्या गेल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हा पेपर नेमका किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचा अचूक आकडा शोधणे आता CBI समोर मोठे आव्हान बनले आहे.


​पालकांनीच सुरू केला पेपर विक्रीचा ‘धंदा
या चौकशीत एक अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही प्रभावशाली पालकांनी स्वतःच्या मुलांसाठी दलालाकडून मोठी रक्कम देऊन पेपर विकत घेतला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी थांबून न राहता तोच पेपर इतर गरजू पालकांना आणि विद्यार्थ्यांना विकून पैसे कमवण्याचा नवा ‘धंदा’ सुरू केला. यामुळे या पेपरफुटीची साखळी प्रचंड मोठी झाली असून, पुढील अटकेंनंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


​बँक खात्यांचे व्यवहार तपासणार; ‘हे’ संशयित रडारवर
तपास यंत्रणेने आता अशा सर्व पालकांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्यांच्या बँक खात्यातून संशयित आरोपी शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी किंवा त्यांची पुणे येथील सहकारी मनिषा वाघमारे यांच्या खात्यात पैशांचे मोठे व्यवहार झाले होते. मोठी रक्कम देऊन पेपर विकत घेणारे हे सर्व प्रभावशाली पालक आता थेट CBI च्या रडावर आले असून त्यांच्यावर लवकरच कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---