इराण-अमेरिका शांतता चर्चेला वेग; पाकिस्तान मध्यस्थाच्या भूमिकेत, पश्चिम आशियात आशेचा किरण

---Advertisement---

 

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता शांतता चर्चांना वेग आला असून, संघर्षविराम कराराच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यस्थांच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये सकारात्मक संदेशांची देवाणघेवाण सुरू असून, कराराचा मसुदा तयार करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असल्याचे इराणच्या आयएसएनए (ISNA) वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, दुसऱ्या अधिकाऱ्याने अद्याप अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबीओ यांनी कराराबाबत सकारात्मक संकेत मिळत असल्याचे सांगितले. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने युरेनियम साठा न सोडल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असली तरी चर्चेच्या हालचालींमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.


दरम्यान, इस्राएल ने गाझामध्ये मदत घेऊन जाणाऱ्या जहाजांच्या ताफ्यातील परदेशी कार्यकर्त्यांना देशाबाहेर काढल्याची माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांना दिलेल्या कथित वाईट वागणुकीवरून जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
याशिवाय, दक्षिण लेबणोन मध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एका सरकारी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात अनेक कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---