---Advertisement---
Jalgaon Crime : किरकोळ कारणावरुन चौघांनी तरुणाला मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत तरुण जखमी झाला. रविवारी (५ एप्रिल) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील आंबेडकर मार्केटच्या मागील बाजुल घडली. याप्रकरणी अनोळखी चौघां संशयित तरुणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चंदन संचानंद भारती (वय २७.रा. साडीदुकान, रा. कुंवरनगर, सिंधी कॉलनी, जळगाव) व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, मोटार सायकल लावण्याच्या कारणावरुन संशयितांनी हुज्जत घालत वादाला तोंड फोडले. संशयितानी चाकुसारख्या शस्त्राने तरुणाच्या कमरेखाली दोन वार केले. एका साथीदाराने त्याच्या डोक्याला फायटरने मारले. चंदन यांचा मित्र विशाल इंगळे यास एका संशयिताने लाथाबुक्क्यांनी मारले. धिरज बाविस्कर याला अन्य साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, आंबेडकर मार्केटच्या मागील बाजुस नेहमी विनाकारण गर्दी होते. याठिकाणी अवैधरित्या मटका जुगार चालतो. त्यामुळे खेळण्यासाठी आणि भाव काय आला, ही माहिती जाणुन घेणाऱ्यांची याठिकाणी नेहमी गर्दी दिसते. आणि या गर्दीचा, वाहनांचा विनाकारण त्रास येथल्या व्यावसायिकांना होतोय, अशी भावना व्यक्त होताना दिसतेय. याठिकाणी अवैध व्यवसाय चालतो किंवा कसे? हे जाणुन घेण्यासाठी पोलिसांनी पडताळणी करावी, अशी भावना काही व्यावसायिकांनी व्यक्त केली. चौघांनी व्यवसायिकाला केलेली मारहाण हा दुर्देवी प्रकार असुन व्यावसायिकांना निर्भयतेचे वातावरण राहिले नाही, असा सुर या घटनेनंतर उमटला.









