सुसाट वाहनाची रिक्षाला धडक कुटुंबातील तिघे जण जखमी

---Advertisement---

 

जळगाव : भरधाव आयशरने रिक्षाला धडक दिली. या अपघातात एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले. शनिवारी (४ एप्रिल) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील फातेमानगर, साई फॅक्ट्रीजवळ रस्त्यावर घडली. याप्रकरणी रविवारी आयशर (एमएच ४८ सीबी ७९४१) वरील चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोहम्मद युनुस रफीयोद्दीन शेख (वय ७०, रिक्षा चालक रा. फातीमानगर) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यासह कुटुंबातील तीघे जण रिक्षामधुन जात होते. साई फॅक्ट्रीजवळ आयशर गाडीने रिक्षाला धडक दिली. या अपघातात मोहम्मद युनुस यांच्यासह त्यांच्या सुन शबाना शेख इसा, नात अबिशाबी (रा. फातेमानगर) हे जखमी झाले. तसेच रिक्षाचे नुकसान झाले. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी न थांबता वाहनासह चालक वेगाने पसार झाला. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रस्त्याच्या कडेला केले. त्यानंतर अन्य रिक्षात टाकुन त्यांना उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी अपघाताच्या ठिकाणी जावुन माहिती घेतली. त्यानंतर रुग्णालयात जावुन डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले जाईल. तसेच अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेतला जाईल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. हवालदार रामदास कुंभार हे तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---