धरणगावात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्त्याचार; बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी शिक्षक अटकेत….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून एका शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार हा उघडकीस आला आहे. या अल्पवयीन विद्यार्थिनीवर गेल्या तीन वर्षांपासून या शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार सुरू असल्याचा आरोप हा करण्यात आला असून त्रास असह्य झाल्यानंतर संतप्त विद्यार्थिनी व तिच्या नातेवाईकांकडून शिक्षकाला मारहाण करण्यात आली आहे. आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होणार होत आहे.

धरणगाव येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून आरोपी राहुल अहिरे असं संशयित आरोपी शिक्षकाचं नाव आहे. सदर पीडित तरुणी ही नववीमध्ये शिकत असल्यापासून या विद्यार्थिनींच लैंगिक शोषण केल्याचा आरोप हा करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार उघडकीस आणला व तिच्या नातेवाईकांना सांगितलं. त्यानंतर लिंगपिसाट आरोपी शिक्षक राहुल अहिरे याला पीडितेच्या कुटुंबीयांनी चांगलाच झोप दिला आहे. दरम्यान चोप देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आरोपी शिक्षक राहुल अहिरे याने पीडित विद्यार्थीनी सोबत गोड बोलून सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला. शारीरिक संबंधांचे फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकीत देत वारंवार शारीरिक संबंधांची मागणी तो विद्यार्थिनीकडे करू लागला. हा संताप जनक प्रकार 2022 ते सप्टेंबर 2025 या दरम्यान सुरू असल्याचा सध्या समोर आला आहे.

एकंदरीत संतप्त विद्यार्थिनी व तिच्या नातेवाईकांनी संबंधित शिक्षकाला काठ्यांनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आता पीडित विद्यार्थीनीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिक्षक राहुल अहिरे यांच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे आणि याविषयीचा पुढील तपास हा पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---