जळगावकरांना यंदा आंब्यांची मेजवानी चाखायला मिळणार; तब्बल 30 पेक्षा अधिक जातींचे आंबे बाजारात दाखल…

---Advertisement---

 

उन्हाळाच्या चाहूल लागताच ओढ लागते ती फळांचा राजा आंब्याची. जळगावात यंदा आंब्यांचा हंगाम रंगात आला असून बाजारपेठेत तब्बल 30 पेक्षा अधिक जातींचे आंबे दाखल झाले आहेत. त्यामुळे जळगावकर आंबा प्रेमींसाठी हा हंगाम खास ठरणार आहे. गुजरातच्या केसरपासून ते सिंधुदुर्ग आणि देवगडच्या हापूसपर्यंत विविध दर्जेदार आंब्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी पाहायला मिळत आहे.

मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत आंब्यांच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाली असली तरीही ग्राहकांची मागणी मात्र अजिबात कमी झालेली नाही. उलट विविध चवी आणि प्रकारांचा आस्वाद घेण्यासाठी जळगावकर मोठ्या उत्साहाने बाजारात गर्दी करत आहेत. यंदा आंब्याच्या हंगामात केशर आणि हापूससह बदाम, आम्रपाली, सोनपरी, हिमसागर, मालदा, दशेरी, लंगडा, पायरी, सुंदरी यांसारख्या अनेक प्रकारचे आंबे बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे.

जळगावच्या बाजारपेठेत आंब्याच्या दरांबाबत पाहिले तर कर्नाटक आणि केरळमधील बदाम आंबा 150 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे, तर देवगड हापूस 600 ते 1000 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गुजरातचा केशर सुमारे 800 रुपये किलो, रत्नागिरी केशर 600 रुपये किलो, तर पायरी 400 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातून आलेले लंगडा आणि दशेरी हे आंबे 300 रुपये किलो दराने विकले जात आहेत. हिमसागर 900 रुपये किलो, सोनपरी 500 रुपये किलो, मलिका 550 रुपये किलो, तर आम्रपाली 700 रुपये किलो दराने ग्राहकांना मिळत आहे. काही प्रीमियम प्रकारांमध्ये रत्ना आंब्याचा दर तब्बल 1200 रुपये किलोपर्यंत गेला आहे.

यंदा दर जरी वाढले असले तरी आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारात चांगलीच रेलचेल पाहायला मिळत आहे. विविध राज्यांमधून आलेल्या आंब्यांमुळे जळगावकरांना यंदा आंब्यांचा खरा मेजवानी अनुभवायला मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---