बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यावर धाड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई…!

---Advertisement---

 

मानवी जीवनाला घातक असलेल्या इम्पेरियल ब्ल्यू दारूच्या बनावट निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून छापा टाकत बनावट दारू निर्मितीचा कारखाना हा उध्वस्त केलेला आहे.

धुळे शहरातल्या अंबिका नगर भागात चंडिका हॉटेलच्या मागे एका पत्राच्या शेडमध्ये हा अवैध बनावट इम्पेरियल ब्ल्यू दारूचा कारखाना सुरू होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून मध्यरात्री धाड टाकली. या कारवाई पोलिसांनी दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या धाडी घटनास्थळी आरोपी रवींद्र रमेश महाजन (वय 27 रा. सहजीवन नगर धुळे) हा साथीदारासह बनावट मध्ये तयार करताना मिळून आला. या ठिकाणी रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य भरून त्यांना नामांकित कंपनीचे लेबल लावले जात होते.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय श्रीराम पवार, अमरजीत मोरे यांच्यासह अमलदार पवन गवळी, सचिन गोमसाळे राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, आरिफ पठाण व मयूर पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---