भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ रेल्वेच्या वेळापत्रक बदल; १४ एप्रिलपासून वेळेत बदल लागू.

---Advertisement---

 

भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील काही प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात १४ एप्रिल २०२६ पासून बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे अनेक गाड्यांची येण्याची आणि जाण्याची वेळेत फरक पडणार असून प्रवाशांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.

भुसावळ विभागातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणारी महत्त्वाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती एक्सप्रेस १४ एप्रिलपासून आता नव्या वेळेनुसार धावणार आहे. या गाडीचे नाशिकरोड येथे पहाटे ००.१५ वाजता आगमन होईल. त्यानंतर जळगाव येथे ०३.१३, भुसावळ येथे ०३.४०, मलकापूर येथे ०४.३८, नांदुरा येथे ०४.५८, शेगाव येथे ०५.१८, अकोला येथे ०६.१०, मूर्तिजापूर येथे ०६.४८, बडनेरा येथे ०७.५७ आणि अखेरीस अमरावती येथे ०८.३५ वाजता पोहोचेल. विशेष म्हणजे या बदलामुळे जळगाव स्थानकावर सुमारे ३३ मिनिटे आणि भुसावळ येथे सुमारे २० मिनिटे उशिरा आगमन होणार आहे.

१. गाडी क्रमांक १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर दुरांतो एक्सप्रेसच्या प्रस्थान वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता रात्री ०८.३५ वाजता सुटेल, जी याआधी ०७.५५ वाजता सुटत होती. या गाडीचे भुसावळ येथे पहाटे ०२.४५ आणि बडनेरा येथे ०५.४८ असे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. परतीच्या प्रवासात १२२९० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेसचे बडनेरा येथे रात्री १०.१० आणि भुसावळ येथे पहाटे ००.५० वाजता आगमन होईल.

२. गाडी क्रमांक १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल या गाडीच्या मूर्तिजापूर आणि बडनेरा स्थानकांवरील वेळेत सुधारणा करण्यात आली आहे. अहमदाबाद-पुरी मार्गावरील १२८४४, २२९७३ आणि २०८६२ या गाड्यांचे बडनेरा येथे आगमन वेळ एकसारखी ठेवण्यात आली असून, त्या सकाळी ०८.०२ वाजता पोहोचतील. या बदलांची अंमलबजावणी अनुक्रमे १५, १६ आणि १७ एप्रिलपासून होणार आहे.

३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोंदिया विदर्भ एक्सप्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला असून ती आता बडनेरा येथे सकाळी ०५.५८ वाजता पोहोचेल. तसेच ब्रम्हपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस, अजनी-पुणे साप्ताहिक एक्सप्रेस आणि वातानुकूलित साप्ताहिक एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळेतही सुधारणा करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी. स्थानकांवरील डिजिटल फलक, चौकशी केंद्रे आणि अधिकृत संकेतस्थळांवर अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आधीच नियोजन करणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---