अमळनेरजवळ भीषण रेल्वे अपघात; युवकाने दोन्ही पाय गमावले, प्रकृती गंभीर, पुढील उपचार सुरू..!

---Advertisement---

 

सुरतहून अमळनेरकडे आपल्या गावी परत येत असताना एका युवकाचा भीषण रेल्वे अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात संबंधित युवकाचे दोन्ही पाय गमावले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा युवक अमळनेर शहरातील तांबेपूरा परिसरातील रहिवासी असून तो सुरतहून रेल्वेने अमळनेरकडे प्रवास करत होता. प्रवासादरम्यान अज्ञात कारणामुळे तो रेल्वेखाली आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातात त्याचे दोन्ही पाय कापले गेले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी युवकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---